कुर्ल्यात चालत्या रिक्षाने घेतला पेट

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

कुर्ला - चालत्या रिक्षाला आग लागल्याची घटना बुधवारी कुर्ल्यातल्या अल बरकत शाळेजवळ घडली. सीएनजी लिकेजमुळे ही आग लागल्याचं सांगितलं जातंय. प्रत्यक्षदर्शी कप्तान मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षा अल बरकत शाळेजवळ पोहचली तेव्हा रिक्षाने पेट घेतला. मात्र यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. स्थानिक पोलीस आणि रहिवाशांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

पुढील बातमी
इतर बातम्या