बांगलादेशींना भारतीय नागरीकत्व देणारा गजाआड

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - बांगलादेशी नागरिकांना पाच हजार रुपयांत बनावट कागदपत्राच्या आधारे भारतीय नागरीकत्व देणाऱ्या एका आरोपीला आझाद मैदान पोलिसांनी अटक केली आहे. लतिफ अतिम गाझी असे या आरेपीचे नाव आहे. आजाद मैदान पोलिसांना गुप्त माहिती मिळाली त्यानुसार, पोलिसांनी या आरोपीवर नजर ठेवली होती आणि एक डमी बांगलादेशी नागरीक असल्याचे सांगत लतिफ गाझीकडून कागदपत्रे बनवून घेतली. कागदपत्र हातात येताच पोलिसांनी त्याला अटक केली. अधिक चौकशी केली असता पाच हजार रूपये घेऊन हा आरोपी बनावट कागद पत्रे तयार करून देत असल्याचे उघड झाले. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या