अखेर बबिता सापडली !

मुंबई - बीएआरसीची हरवलेली वैज्ञानिक बबिता सिंगचा अखेर शोध लागला आहे. बबिता ही तामिळनाडूच्या पुद्दुचेरीतील एका आश्रममध्ये असल्याचं समजताच तिचे कुटुंबीय पुद्दुचेरीच्या दिशेने रवाना झाले आहेत. 'माझी काळजी करू नका' असं स्वतः बबिताने घरच्यांना फोन वर सांगिल्याने सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे.

23 तारखेपासून वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून बबिता नेरुळ येथून घर सोडून निघून गेली होती. सगळ्या अाशा संपल्या असून रोज मरण्यापेक्षा एका फटक्यात मेलेलं बरं हे बबिताचे शेवटचे शब्द होते. आपला फोन देखील तिने घरी सोडल्याने कोणालाच काही समजत नव्हतं.

2011 पासून बबिता सिंग ही भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये वैज्ञानिक अधिकारी या पदावर कार्यरत होती. पण भरती झाल्यापासूनच तिचा छळ होत असल्याचा उल्लेख तिने मेलमध्ये केला होता. पण आतातरी तिच्या तक्रारींकडे वरिष्ठ पातळीवर लक्ष दिलं जाणार की नाही हा खरा प्रश्न आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या