वेश्या व्यवसायातून बांगलादेशी तरुणीने केली स्वत:ची सुटका

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

नोकरीचे आमीष दाखवून जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकललेल्या 21 वर्षीय तरुणीने मोठ्या शिताफीने स्वत:ची सुटका घेत, परदेशी तरुणींची फसवणूक करणार्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिस ठाण्यात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या टोळीचा पोलिस शोध घेत आहेत.

मुंबईत नोकरीचं दिलं आश्वासन

मूळची बांगलादेशची असलेली तरूणी उच्च शिक्षित आहे. मागील अनेक दिवसांपासून ती नोकरीच्या शोधात होती. त्यावेळी पीडित तरूणी मामाच्या संपर्कातून आरोपी भारतीय एजंटच्या संपर्कात आली. त्या एंजटने मुलीला चांगली नोकरी देण्याचे आश्वासन दिले. तिचा विश्वास बसावा यासाठी तिचे डाक्युमेंट घेऊन एका सिक्युरिटी एजन्सीचा फॉर्मही दिला.

जबरदस्तीने ढकलले वेश्या व्यवसायात

23 जानेवारी रोजी आरोपी पीडित महिलेला घेऊन बांगलादेशहून बोटीने कोलकाता येथे आला. तेथून रेल्वेने त्याने तिला मुंबईला आणले. मुंबईत आणल्यानंतर त्याने तिला जबरदस्ती वेश्या व्यवसायात ढकलले. तरुणीने विरोध केल्याने त्याने तिला एका खोलीत डांबून ठेवले. सलग तीन दिवस त्या एंजटकडून पीडित मुलीची पिळवणूक होत होती.

पीडितेने शिताफीने काढला पळ

दरम्यान, 27 जानेवारी रोजी मध्यरात्री सर्व आरोपी गाढ झोपेत असताना पीडित मुलीने स्वत:ची सुटका करून घेतली. पहिल्या माळ्यावरून पाईपने खाली उतरत पीडितेने पळ काढला. मात्र, मुंबई तिच्यासाठी नवीन होती. त्यात तिला हिंदी येत नव्हती. मध्यरात्री मोकळ्या रस्त्यावरून पळत ती कशीबशी मरीन ड्राइव्हला पोहोचली.

देवासारखा भेटला बंगाली टॅक्सीचालक!

एका बंगाली टॅक्सीचालकाने घाबरलेल्या तरुणीकडे विचारपूस केल्यानंतर आपल्यासोबत घडलेला प्रकार तिने त्याला सांगितला. क्षणाचाही विचार न करता टॅक्सी चालकाने पीडित मुलीला घेऊन डी. बी. मार्ग पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यासाठी एक पथक पाठवले. मात्र सर्व आरोपींना घटनास्थळाहून पळ काढला होता. संबधित आरोपींचा पोलिस शोध घेत असल्याचा माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


हेही वाचा

मालाडमध्ये हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पुढील बातमी
इतर बातम्या