तलवारीने केक कापनं पडलं महागात, बर्थडे बॉयसह ६ जणांवर गुन्हा दाखल

सध्या शहर असो किंवा गाव प्रत्येक ठिकाणी चौकात मोठ्या थाटात वाढदिवस साजरे करण्याची फॅशन जोरदारपणे सुरु आहे. गावामधील गल्ली गल्लीत दादा, भाई, भाऊ यांचे वाढदिवस धुमधडाक्यात साजरे होतात. मुंबईच्या नेहरूनगर परिसरातही असाच एका मुलाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यावेळी ६ केक त्याने तलवारीने कापले. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यासह ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्तारासाठी होणार २ वर्षांचा विलंब

कुर्लाच्या नेहरूनगरच्या झम झम बेकरी गल्ली, अलिदादा इस्टेट परिसरात समीरउद्दिन जमीरउद्दिन अन्सारी हा राहतो. शनिवारी त्याचा २० वा वाढदिवस म्हणून त्याच्या मित्रांनी त्याच्या नावाचे सहा केक घेऊन आले होते.  समीरउद्दिनचा  वाढदिवस साजरा होत असताना समीरउद्दिन याने तलवारीने केक कापला. केक कापलेले फोटो आणि काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वाढदिवस करताना तलवार या घातक हत्याराने केक कापला. कोविडच्या पार्श्वभूमिवर शहरात जमावबंदी आणि हत्यारबंदी असताना. देखील नियम पायदळी तुडवत समीरउद्दिन याने कायद्याचे उल्लघंन केले. हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली. त्यानुसार कुर्लाच्या नेहरूनगर पोलिस ठाण्यात तोंडाला मास्क न लावता एकत्र जमून आदेशाचे उल्लंघन करून हयगयीचे कृत्य केले म्हणून कलम १८८ ,२६८ ,२७०,२७१ भादवी सह राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५,कलम ५१,(ब) महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२०चे कलम ११ तसेच विनापरवाना शस्त्राचा वापर केल्याने कलम ४,२५ भा. ह.का.तसेच विनापरवाना तलवारीने केक कापून मा.पोलीस आयुक्त सो, मुंबई यांच्या हत्यार बंदी आदेश उल्लंघन केल्याने कलम ३७(१) ,(अ) १३५ म.पो.का.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

हेही वाचाः- सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडच्या विस्तारासाठी होणार २ वर्षांचा विलंब

या प्रकरणी पोलिसांनी समीरउद्दिन जमीरउद्दिन अन्सारीसह त्याचे मित्र मोहंमद असिफ समीउल्हा इद्रिसी १९, तौफिक रफिक शेख, २२, अरबाज आयुब शेख२३, मिसम अब्बास आश्रफ हुसेन सय्यद १९, अमान तन्वीर शेख१९ यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या