महापालिकेचे अधिकारी पोलिसांच्या रडारवर

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

रस्ते घोटाळ्याप्रकरणी महापालिकेचे अधिकारी पोलिसांच्या रडारवर सापडणार आहेत. लवकरचं या घोटाळ्याप्रकरणी आणखी काही अधिका-यांना अटक होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांनी याप्रकरणातल्या अधिकाऱ्यांच्या नावांची यादी लोकायुक्तांकडे सादर केली. त्यानंतर लोकायुक्त आणि माजी न्यायमूर्ती मदनलाल तहिलयानी यांनी पोलीस योग्य दिशेने तपास करत असल्याचे सांगत गलगलींची तक्रार दाखल केली. यामध्ये आतापर्यंत 26 जणांना अटक करण्यात आली आहे. आधीच गुन्हे दाखल असलेल्या कंत्राटदारांना मुंबईतील 4 कामाचं कंत्राट देण्यात आलं होतं. त्यामुळे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी लोकायुक्त आणि माजी न्यायमूर्ती मदनलाल तहिलयानी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.तसंच सुनावणी दरम्यान पालिकेचे अभियांत्रिकी संचालक लक्ष्मण व्हटकर, मुख्य अभियंता शीतलाप्रसाद कोरी आणि रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे उपस्थित होते. 

पुढील बातमी
इतर बातम्या