...त्याची तक्रार खोटीच

  • सचिन गाड & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम
मुंबई- पोलिसात खोटी तक्रार दाखल करून प्रकाशझोतात येणे हे एका क्रिएटिव्ह डायरेक्टरला चांगलेच महागात पडले. खोटी तक्रार दाखल केल्याप्रकरणी पोलिसांनी क्रियेटिव्ह डायरेक्टर वरुण कश्यप भुयाणविरोधात दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. भुयाणने गाईच्या चामड्यापासून बनवलेले बॅग वापरल्याच्या संशयावरून गोरक्षकांनी धमकी दिल्याची तक्रार केली होती. १९ ऑगस्टच्या सकाळी रिक्षातून कामावर जात असताना रिक्षाचालकाने वरूणला त्याची बॅग ही गाईच्या चामड्यापासून तर बनवली नाहीना असा प्रश्न विचारला होता, एवढच नाही तर आड बाजूला नेऊन धमकी दिल्याचा आरोपही वरुणने केला होता. या आशयाची पोस्ट देखील वरुणने फेसबुकवर टाकल्याने चांगलाच गदारोळ झाला होता. मात्र यासंदर्भात कोणताच सुगावा लागलेला नाही. तसेच जी वेळ वरुण सांगत होता त्यावेळी तो घरीच होता' अशी माहिती डीएननगर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अरुण चव्हाण यांनी दिली. 

 

पुढील बातमी
इतर बातम्या