त्या चिमुरडीला दिला कामा रुग्णालयाने आश्रय

  • मुंबई लाइव्ह टीम & सोनाली मदने
  • क्राइम

चर्चगेट लोकलच्या अपंग डब्यात सापडलेल्या ५ दिवसाच्या चिमुरडीला कामा रुग्णालयाने आश्रय दिला आहे. हे नवजात बाळ शारीरिक दृष्ट्या कमकुवत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

हृदयाला छिद्र

कामा रुग्णालयात या बाळाची तपासणी करण्यात आल्यावर त्याच्या हृदयाला छिद्र करण्याचं निष्पन्न झालं. यामुळेच कदाचित त्याच्या आई-वडिलांनी बाळाला लोकलमध्ये टाकून दिल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला.

कामा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी या लहान मुलीच्या उपचाराची जबाबदारी घेतली आहे. या चिमुरडीवर चांगले उपचार करून तिला बरं करू, असा विश्वास डाॅक्टरांनी व्यक्त केला आहे.

चर्चगेट स्टेशनवर सापडलेल्या अर्भकाची शारीरिक परिस्थिती कमकुवत असल्याने त्याला सध्या कामा रुग्णालयातील आयसीयू विभागात हलवण्यात आलं आहे. उघड्यावर टाकून दिल्याने बाळाला संसर्ग झाला आहे. त्यावर सध्या उपचार चालू आहे .

- राजश्री कटके, अधिक्षिका, कामा रुग्णालय


हेही वाचा-

लोकलमध्ये सापडली ५ दिवसांची चिमुरडी


पुढील बातमी
इतर बातम्या