दहिसरमध्ये सुसाट कारचा थरार

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

दहिसर - मद्यपी चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुसाट कारची टक्कर बसून टेंपो दुकानात घुसल्याची घटना शनिवारी रात्री दहिसर पूर्व परिसरात घडली. या कारवर बत्ती असून, पाठीमागे 'महाराष्ट्र शासन' असे लिहिलेले असल्याने ही कार कुठल्या नेत्याची असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

रविवारी दहिसरमध्ये भाजपाचे दोन कार्यक्रम होते. त्यामुळे पक्षाचे बरेच नेते दहिसरमध्ये आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री दहिसर पूर्व डीसीपी ऑफिसकडून येणाऱ्या होंडासिटी ( एमएच - 01, एव्ही - 5989) या कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर या कारची धडक बसून रस्त्याच्या कडेला उभा असलेला टेंपो अकबर मार्केटमधील दुकानात शिरला. या सुसाट कारच्या चालकाचे नाव सचिन प्रभाकर असून, या अपघाताबाबत पोलिसांकडून  अधिक माहिती देण्यात आलेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या