चायनीज-कॅनेडियन शेफ विरोधात मुंबईत गुन्हा दाखल

अमेरिकेत चायनीज रेस्टॉरन्ट काढण्याच्या नावाखाली दोन लाख अमेरिकन डॉलर(एक कोटी चाळीस लाख रुपये) घेऊन वांद्रे येथील प्रसिद्ध रेस्टॉरन्टच्या मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी प्रसिद्ध चायनीज-कॅनेडीयन शेफ विरोधात खार पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः- विजय मल्ल्याची फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता जप्त

केल्विन चिंग व त्याचे वडील चिपिंग चिंग यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार रणजीत बिंद्रा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी खार पोलिसांनी भादंवि कलम ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. चिंग हा 2015 मध्ये बिंद्रा यांच्या रेस्टॉरन्टमध्ये प्रमुख शेफ म्हणून कामाला होता. त्यावेळी चिंगने अमेरिकेत शिकागो व लॉस एन्जलिस(एलए) येथे रेस्टॉरन्ट काढून त्यात गुंतवणूक करण्यास बिंद्राला पैसे गुंतवण्यास सांगितले. चिंगच्या वडिलांमार्फत बिंद्राने तेथे दोन लाख अमेरिकन डॉलर गुंतवले. विविध व्यवहारांतर्गत ही रक्कम गुंतवण्यात आल्याचे अधिका-याने सांगितले. गेल्यावर्षी चिंगचे वडील यांचा मृत्यू झाल्याचे सांगून तो परदेशी गेला. त्यावेळी त्याने नोकरीही सोडली. अनेकवेळा संपर्क साधूनही त्यानंतर कोणताही प्रसिद्ध बिंद्रा यांना मिळाला नाही. त्यानंतर चिंगने त्याला प्रतिसाद देणे बंद केले. नुकतीच चिंग भारतात परतल्याचे बिंद्रा यांना कळाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी खार पोलिसांना तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनीही गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अद्याप कोणलाही अटक करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले

पुढील बातमी
इतर बातम्या