वसईत क्लोरिन गॅस गळती, एकाचा मृत्यू 18 जखमी

वसई पश्चिमेतील दीवामान परिसरातील महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकी खाली असलेल्या क्लोरिन गॅस सिलेंडरची अचानक गळतीमूळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून तर 18 जण जखमी झाले आहेत.

जखमींमध्ये महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील 4 कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. तर देव कांतीलाल पारडीवाल वय 59 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.

वायुगळती होतानाचा आणि मयत देव पार्टीवाल यांना क्लोरीन गॅसची बाधा कशी झाली, त्यांना खाजगी वाहनाने रुग्णालयात नेले, ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वायू गळतीची थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी फायरमन पंकज सातवी आणि फायरमन स्वप्निल घाग यांनी जीवाची परवा न करता ऑक्सिजन मास लावून दुर्घटनाग्रस्त क्लोरीनचा सिलेंडर घटनास्थळापासून दूर एका नाल्यामध्ये नेऊन निष्क्रिय केला. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत गळती रोखल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

जखमीमध्ये अग्निशमन दलाच्या 5 जवानांचा समावेश

विजय राणे- 53-सनसिटी प्रभारी केंद्र अधिकारी, ICU मध्ये भरती

चालक प्रमोद पाटील वय 43 ICU मध्ये भरती

फायरमन कल्पेश पाटील वय 41- ICU मध्ये भरती

फायरमन कुणाल पाटील वय 28 ICU मध्ये भरती

चालक सचिन मोरे - डिस्चार्ज देण्यात आली

तसेच इतर 14 नागरिकांना देखील बाधा झाली आहे. त्यांच्यावर डिवाईन हॉस्पिटल दिवामन आणि डीएम पाटील हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या