दादरमध्ये सापडलं 9 कोटींचं कोकेन, नायजेरियन व्यक्ती अटकेत

दादर स्थानकातून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोने 9 कोटींचे कोकेन घेऊन जाणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे. एनेह एम्बी विल्फ्रेड(47) असं या नायजेरियन नागरिकाचं नाव आहे. या प्रकारामुळे दादरमध्येही अंमली पदार्थ तस्करीचं रॅकेट कार्यरत झालं असण्याची शक्यता आहे.राजधानी एक्स्प्रेसने एक नायजेरियन मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ घेऊन जाणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. तात्काळ एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दादर स्थानकात सापळा लावत संशयावरून एनेह एम्बी विल्फ्रेड या नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तब्बल सव्वा किलो कोकेन सापडले. कुरिअरच्या पार्सलसारख्या पाकिटामध्ये कोकेन बांधण्यात आले असून, त्याने काही हजारांसाठी हे कृत्य केल्याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. विशेष म्हणजे याआधी देखील राजधानी एक्स्प्रेसचा ड्रग्सच्या तस्करीसाठी वापर करण्यात यायचा. त्यामुळे एखादी जुनी टोळी पुन्हा सक्रिय तर झाली नाही ना? असा संशय एनसीबीला आहे. या प्रकरणी एनेह एम्बी विल्फ्रेड सह आणखी आरोपी असण्याची शक्यता वर्तवली जात असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या