वरळीतील दोन पोलिसांना कोरोनाची लागन


देशात कोरोनाचा थैमान दिवसेंदिवस वाढतच आहे. कालपर्यंत महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या 338 वर पोहचली आहे. या कोरोनाचा हा संसर्ग आता नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांपर्यंत पोहचला आहे.   वरळीतील पोलिस कँम्प मधील दोन शिपायांना कोरोनाची लागन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोघांना उपचारासाठी आता कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

 

मुंबईच्या कायम वर्दीळीचे ठिकाण म्हणून सीएसएमटी स्थानक ओळखले जाते. या स्थानकावरील रेल्वे पोलिस ठाण्यात  असलेल्या एका शिपायाला कोरोनाची लागन झाल्याची घटना ताजी असताना, वरळीत आणखी दोन पोलिस शिपायांना कोरोनाची लागन झाल्याचे पुढे आले आहे. या दोन्ही शिपायांना पुढील उपचारासाठी तातडीने कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर पोलिस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दोघे ही रहात असलेला परिसर रिकामी केला असून त्या भागात प्रवेश दिला दात नाही आहे. या दोघांच्या संपर्कात असलेल्या सर्व कुटुंबियांना देखील पोलिसांनी विलगीकरण कक्षात हलवले आहे. त्यांची देखील कोरोनाची चाचणी आता केली जाणार आहे. त्याच प्रमाणे हे दोघे ज्या ठिकाणी बंदोबस्तास होते. त्यांच्या संपर्कातील इतर पोलिसांची ही चाचणी आता केली जाणार आहे.
 
   वरळीत या दोन शिपायांना कोरोनाती लागन झाल्याचे वृत्त समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. लवकरच या परिसरात पालिकेकडून निरजंतूकीकरण फवारणी केली जाणार असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी वर ळीच्या कोळीवाडा परिसरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळून आले होते. आता ही या परिसरातली दुसरी घटना आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या