कोरोना संशयीत रुग्णालयातून पळाल्यास 6 महिन्यांचा तुरुंगवास

कोरोना व्हायरसची नागरिकांच्या मनात मोठी भिती निर्माण झाली आहे.  नागपूर आणि अहमदनगरमधील रुग्णालयातून काही दिवसांपूर्वी कोरोनाचे संशयित रुग्ण पळून गेले होते. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर पाऊल उचलले आहे. अनिल देशमुख यांनी पळून गेलेल्या रुग्णांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता देशात साथरोग प्रतिबंध कायदा लागू करण्यात आला आहे. एखाद्या आजाराला आळा घालण्यात सर्व प्रयत्न अयशस्वी होत असतील, तेव्हा हा कायदा लागू केला जातो. राज्यांना कारवाई करण्याचे अधिकार दिले जातात.  महाराष्ट्रातही हा कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो.  

हातावर क्वारंटाइन शिक्का असलेल्या सहा जणांना सौराष्ट्र एक्स्प्रेसमधून गुरूवारी खाली उतरवण्यात आले. हे प्रवाशी सिंगपूरहून मुंबईत आले होते. नंतर ते सगळे मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र एक्स्प्रेसने बडोदा जाण्यासाठी निघाले होते. गाडी बोरिवली स्टेशनवर पोहोचताच त्यांना ट्रेनमधून खाली उतरवण्यात आले. हातावर कोरोनाचा शिक्का असतानाही विलगीकरण कक्षात राहण्याऐवजी हे प्रवाशी ट्रेनने बिनधास्त प्रवास करत होते. या संशयितांना तात्काळ ट्रेनमधून उतरवण्यात आले आहे.

कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण कुणाच्याही संपर्कात येऊ नये यासाठी राज्य सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. राज्य सरकारकडून या रुग्णांच्या हातावर क्वारंटाइनचा शिक्का मारण्यात येत आहे.  


हेही वाचा - 

Coronavirus : राज्यातील कोरोनाबाधीतांची हाफ सेंच्युरी, ३ नवे रुग्ण आढळले

 पंतप्रधानांच्या ‘जनता कर्फ्यू’ला १०० टक्के प्रतिसाद देणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे


पुढील बातमी
इतर बातम्या