अबब! चार दिवसात 62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा

राज्यात लाँकडाऊनचे चौथा टप्पा सुरू झाले असून सरकारने अनेक नियमात शितीलता आणली आहे. राज्याच्या मद्यविक्रीवरील ही निर्बंध सरकारने उठवल्याने 28 जिल्ह्यात सध्या दारूची आँनलाईन विक्री केली जात आहे.15 मे 2020 पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा दिल्याने राज्याच्या तिजोरीत कमालीची भर पडलेली आहे. अवघ्या चार दिवसात  62 हजार 916 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात  असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली. 

15 मे 2020 रोजी 5,434 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. तर 16 मे 2020 रोजी 8,268 ग्राहकांना, 17 मे 2020 रोजी 20,485 ग्राहकांना आणि 18 मे 2020 रोजी 28,729  ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यास आली. मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 5,221 अनुज्ञप्ती सुरू आहेत. माञ तरी सुद्धा महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधून अवैध मद्य तस्करी केली जात आहे. ही तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातील अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. 17 मे, 2020 रोजी राज्यात 33 गुन्हे नोंदविण्यात आले असून 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे. रु.4.46 लाख किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर 24 मार्च, 2020 पासुन  17 मे, 2020 पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 5715 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2577 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 579 वाहने जप्त करण्यात आली असून 15.35 कोटी किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

राज्यात 15 मे पासून घरपोच मद्यविक्री योजना अंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्य विक्री सेवा देण्यात येत आहे. मद्य सेवन परवाने राज्य उत्पादन शुल्काच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. तथापी IOS प्रणलीबाबत संकेत स्थळावर अडचणी होत असल्याचे निर्देशनास आले आहे. या प्रणालीतील अडचणी दुर करण्यात येत आहेत तो पर्यन्त मद्यसेवन परवाना घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींच्या निर्देशनास आणण्यात येते की, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व निरीक्षक व दुय्यम निरीक्षक कार्यालये व अधीक्षकांच्या कार्यालयात दरोराज मद्य सेवन परवाने  Offline पध्दतीने देण्याची सोय करण्यात आली आहे. सदर मद्य सेवन परवाने एक वर्षाकरीता रु.100 किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000 एवढे शुल्क अदा करुन मिळू शकताता. तरी मद्य विक्री दुकानासमोर गर्दी न करता मद्य सेवन परवाने घेऊन मद्य घरपोच सेवेचा लाभ घेता येणार आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या