होम क्वारंटाइन असतानाही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

घरात राहण्याचा आदेश असूनही बाहेर फिरणाऱ्या तिघांवर मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे तिघेही परदेशातून भारतात आले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  घरात थांबण्यासाठी सांगितल्यानंतर ही घरात न थांबता बाहेर फिरताना आढळून आले म्हणून या तिघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  घरात थांबण्यासाठी सांगण्यात आलेला 57 वर्षे  घरात न थांबता मालाड पोलीस ठाणे हद्दीत लिबर्टी गार्डन, मालाड पश्चिम मुक्तपणे फिरत असताना मिळुन आला. त्याच्या उजव्या हातावर 'होम क्वारेंटाइन' केल्याचा शिक्का मारलेला होता, तो 16मार्चला दुबई वरून मुंबईत आलेला होता. त्यामुळे त्याच्याविरोधात 188,269,270 भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे  दुबई देशाहुन आलेले 03 भारतीय जण भारतात आले होते. त्यातील दोघ दुबई येथे प्लंबर व electician चे काम करत होते.

 तर  उर्वरित तिसरा व्यक्ती हा दुबईमध्ये राहत असलेल्या भावास भेटण्यासाठी गेला होता. या तिघांना मुंबई विमानतळावर वैदकीय तपासणी करून त्यांना HOME QURANTINE चा शिक्का मारण्यात आला होता व त्यांची तात्पुरती व्यवस्था साकीनाका, अंधेरी व गोरेगाव येथे करण्यात आली होती. या तिघांची त्यांचे मूळ गाव झारखंड येथे जाण्यासाठी शासकीय यंत्रणेमार्फत व्यवस्था करण्यात आली होती. परंतु ते वडाळा येथे भाड्याने राहत असलेल्या मित्राकडे कोणत्याही शासकीय यंत्रणेला न कळविता पळून गेले. याबाबत माहिती मिळताच वडाळा पोलीस तिघांना ताब्यात घेतले. डॉक्टरांच्या मदतीने तिघांना तपासून 3 एप्रिलपर्यंत HOME QURANTINE करणेबाबत सूचना दिल्या.  HOME QURANTINE करिता महानगरपालिकेने या तिघांची व्यवस्था पवई येथे केली होती. माञ तेथे न जाता या तिघांनी पळ काढल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

       

पुढील बातमी
इतर बातम्या