कप-केक विकून 3 वर्षाच्या चिमुरड्याने पोलिसांसाठी मदत म्हणून उभी केली एवढी रक्कम...

कोरोनाच्या संकटसमयी सरकारच्या मदतीला सर्वच स्तरावरून मदत झाली. माञ गाजा बाजा होतो तो फक्त सेलिब्रिटींचा, माञ कुठल्याही प्रसिद्धी करता नाही तर नागरिकांच्या रक्षनासाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांकरता एका 3 वर्षाच्या चिमुरड्याने चक्क 50 हजाराचा निधी गोऴा केला आहे. कबीर जैन असे मुलाचे नाव असून मंगळवारी त्याने पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांना हा धनादेश दिला. 

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेच्या रक्षनासाठी तत्पर असणाऱ्या 1007 पोलिसांना ही या आजाराची बाधा झाली आहे. माञ तरीही मोठ्या शर्तीने पोलिस नागरिकांच्या सुरक्षेसाठी खंबीरपणे उभे आहे. हे पाहूनच या चिमुरड्याने त्याना मदत म्हणून आईच्या मदतीने 50 हजार जमा केले. हे पैसे आयुक्तांकडे सुपूर्द करताना त्याने आयुक्तांच्या हातात एक चिठी दिली. त्यात 'कृपया या वायरसला पकडा आणि तुमच्या बंदुकीने त्याला गोळी घाला. मला माझ्या आजोबा व मित्राना भेटण्यासाठी जायचे आहे. तुम्ही हे औषधं व लॉलीपॉप खरेदी करण्यासाठी वापरू शकता, असे लिहिले होते. 

आयुक्त ही कबीरचे पञ वाचून भावनिक झाले.
लॉकडाऊनच्या काळात अनेकजण घरातच राहून आपले छंद जोपासत आहेत. पण या छंदातून आपण चांगल्या उपक्रमांसाठी पैसे उभे करू शकतो. हे तीन वर्षाच्या कबीरने दाखवून दिले. बनाना वॉलनट मफीन्स व चॉकलेट कपकेक बनवण्यात आईला मदत करणा-या कबीरने याच छंदाच्या माध्यमातून केक विकून हा निधी उभारला. सुरूवातीला मुंबई पोलिस फाउंडेशनसाठी या कुटुंबाने 10 हजार रुपयांची मदत देण्याचे ठरवले होते. पण केक विक्रीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.  या कुटुंबाने 35 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. पण सुमारे 25 हजार रुपयांची केक विक्री झाले, तसेच जवळचे आणखी 25 हजार रुपयांची त्यात भर टाकून 50 हजार रुपयांचा धनादेश या कबीरच्या मार्फत मुंबई पोलिसांना देण्यात आला.

लॉकडाऊनमध्ये सर्व बंद असताना कबीरची आई बेकरी पदार्थ तयार करायची. कबीरही त्यात रुची घेऊ लागला. आम्हीही त्याला व्यस्त ठेवण्यासाठी त्याला केक बनवण्यासाठी प्रोत्साहीत केले. केकचेही प्रमाण वाढल्यानंतर आम्ही याच्यामाध्यमातून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला. माझ्या मित्राच्यामुलानेही अशा पद्धतीने परदेशात चॅरीटी केली होती. त्याच्यापासून प्रोत्साहित होऊन या केकच्या माध्यमातून चॅरीटी करण्याच आम्ही निर्णय घेतला. कबीरलाही शाळेतून वरळी पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांकडे त्याची ओढ होती, अशातूनच पोलिसांसाठी आम्ही मदत निधी उभारण्याचा निर्णय घेतला. आमच्याकडून  सुमारे 30 कुटुंबियांनी केक घेतले. या केकसाठी हे कुटुंबिय किती रक्कम देतील ती रक्कम दुप्पट करून पोलिसांना मदत करण्यात येईल, असे आम्ही स्पष्ट केल्यामुळे अनेकांनी दिलखुलासपण मदत केली, असे कबीरचे वडील केशव जैन यांनी सांगितले. अनेकांनी आमच्याशी संपर्क साधून आगाऊ रक्कही पाठवली आहे. त्यामुळे पुढील काळात सुमारे एक लाख रुपये उभे करण्याचा आमचा मानस अल्याचा जैन यांनी सांगितले
पुढील बातमी
इतर बातम्या