Lockdown in mumbai: मुंबईतल्या 400 रिक्षा, टॅक्सी जप्त, करत होते...

राज्यभरात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही मुंबईत आहे. त्यामुळेच मुंबईला रेड झोनमध्ये टाकत तेथील सर्व व्यवहारांवर निर्बंध लावण्यात आले आहे. अशातच अवैधरित्या रस्त्यावर धंदा करणाऱ्या टँक्सी आणि रिक्षा चालकांवर वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. या कारवाई अंतर्गत पोलिसांनी 400 टँक्सी आणि रिक्षा हस्तगत केल्या आहेत.

मुंबईत कोरोनाचा कहर दिवसेॆदिवस वाढतच आहे. कोरोना हा संसर्ग जन्य रोग असल्यामुळे त्याला नियंञणात आणण्यासाठी राज्यसरकारने सर्वञ लाँकडाऊन केले. त्यानंतर कोरोना बाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येहून रेड झोन, ग्रीन झोन आणि आँरेज झोन अशी विभागणी केली. ग्रीन झोन मधील सर्व व्यवहारांना सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. तर आँरेंज झोनमधील निवडक व्यवहार ते ही कटेन्मेंट झोन वगळून परवानगी दिली. माञ मुंबईला रेड झोन जाहिर केल्यानंतर अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व व्यवसाय आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली. हे माहित असताना सुद्धा काही बेजबाबदार रिक्षा आणि टँक्सीचालक रस्त्यावर धंदा करताना पोलिसांना आढळत होते. 

आधीच मुंबईत एका कोरोना बाधिताने टँक्सीतून केलेल्या प्रवासामुळे पाच जणांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून पोलिसांनी अवैध रित्या धंदा करणाऱ्या टँक्सी आणि रिक्षा चालकांवर एप्रिल  1 ते 30 एप्रिल दरम्यान 647 खासगी सामान पोहचवणाऱ्या रिक्षांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 98 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर प्रवाशांना घेऊन धंदा करणाऱ्या 18 हजार 640 रिक्षाचालकांवर कारवाई करत, 62 लाख 60 हजार 700 दंड वसूल केला आहे. 

तसेच 4 मार्च ते 11 मे दरम्यान  पोलिसांनी रिक्षा चालक आणि टँक्सी चालक यांच्यावर  दोन वेगवेगळ्या स्वरुपाच्या कारवाई केल्या आहेत. त्यातील पहिली कारवाईत प्रवाशी घेऊन जाणे आणि दुसरी म्हणजे दुसऱ्याचे सामान पोहचवणे. पोलिसांनी प्रवाशांना घेऊन अवैध वाहतूक केल्याप्रकरणी 14 हजार 810 जणांवर ई-चलानद्वारे कारवाई केली आहे. या कारवाईतून पोलिसांनी या बेशिस्तंाकडून  55 लाख 71 हजारांचा दंड आकारला आहे. तर खासगी सामानांची ने-आण करणाऱ्या 589 रिक्षा चालकांवर करत 2लाख 62 हजार 800 करत त्यांच्याजवळून दंड आकारण्यात आला आहे.

तर दुसरीकडे मुंबईत अवैधरित्या धंदा करणाऱ्या 3 हजार 368 टँक्सी चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या टँक्सी चालकांकडून पोलिसांनी 12 लाख 36 हजार 500 रुपयांचा दंड आकारला आहे. तर अनेकदा कारवाई करून ही न ऐकणारे आणि पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या  339 रिक्षा आणि 61 टँक्सी चालकांच्या टँक्सी पोलिसांनी जप्त केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.  लाँकडाऊन सुरू असे पर्यंत आणि शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती एका अधिकार्याने दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या