आईसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून, माथेफिरूने केला पोलिसांवर हल्ला...

मरीनड्राइव्हच्या रस्त्यावर शुक्रवारी मध्यराञी राग अनावर झालेला तरुण कोयता हातात घेऊन फिरताना पोलिसांना दिसला. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने चक्क पोलिसांवरच हल्ला केला. या हल्यात तीन पोलिस गंभीर जखमी झाले. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने पोलिसांनी त्याला अटक करून गुन्हा नोंदवला आहे. प्रवीण नायर असे या तरुणाचे नाव असून तो उच्चभ्रू घरातला आहे.

वास्तुविशारदक असलेला प्रवीण कंबाला हिल येथील उच्चभ्रू वस्तीत राहतो. शुक्रवारी त्याचे किरकोळ कारणांवरून आईसोबत भांडण झाले होते. त्यानंतर घरातून निघताना आज कोणाला, तरी मारेन, अशी धमकी देऊन तो कोयता घेऊन घरातून बाहेर पडला. मरिन ड्राईव्ह येथील फुटपाथवरून तो शुक्रवारी राञी चाकू घेऊन फिरत होता. त्यावेळी बोट क्लबजवळ नाकाबंदीमध्ये तैनात पोलिसांनी या तरुणाला पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता तरुणाने चाकू फिरवण्यास सुरूवात केली.  त्याच्या हल्यात पोलिस निरीक्षक जितेंद्र कदम, उपनिरीक्षक सचिन शेळके व शिपाई सागर शेळके असे जखमी झाले. या तिघांवर जे.जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 पोलिसांनी मोठ्या शर्तीने प्रवीणला पकडून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. झाडे कापण्यासाठी वापरण्यात येणारा मोठा चाकू आरोपीकडे होता. तरी पोलिस या हल्ल्या मागील नेमके कारण पोलिस जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडील चाकू जप्त केला आहे. लॉकडाऊनचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का, याबाबतही पोलिस तपास करत आहेत. याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा प्रयत्न, सरकारी कर्मचा-यावर हल्ला करणे, संचारबंदीचे उल्लंघन आदी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
पुढील बातमी
इतर बातम्या