महाराष्ट्रातील 1497 पोलिसांना कोरोना, 33 जणांचा मृत्यू

आपले कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झालेल्या पोलिसांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. महाराष्ट्रात 2562 पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 1497 पोलिसांवर उपचार सुरू आहेत. तर 1065 रुग्णांमध्ये कोरोनाची अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. तस्च 33 जणांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्र पोलिस दलातील 196 अधिकारी व 1497 पोलिसांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर उर्वरित पोलिसांमध्ये कोरोनाचेे अतिसौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्या पोलिसांना क्वारंटाइन  करण्यात आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कोरोना बाधित पोलिसांच्या आकडेवारीत कमालीची वाढ होत होती. माञ सध्या त्यात कमालीची घट झाल्याचे पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसात हाताच्या बोटावर मोजण्या इथपर्यंत संख्या वाढली आहे. तर मागील 24 तासात पोलिस खात्यात फक्त एकाच पोलिसाला कोरोना झाल्याचे पुढेे आले आहे. कोरोनाबाधित पोलिस रुग्णांमध्ये मुंबईतील पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. माञ आनंदाची बातमी म्हणजे  500 हून अधिक पोलिस कोरोनामुक्त होऊन बरे झाले आहेत. त्यातील बहुसंख्य पोलिस पुन्हा सेवेत रुजू झाले आहे. 

सध्या कोरोनाबाधित 1497 पोलिसांवर राज्यातील विविध सरकारी आणि खाजगी रुग्णालयात  तसेच इतर ठिकाणी उपचार सुरु आहेत.तर सुमारे पात हजारहून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 33 पोलिसांना आपले जीव गमवावे लागले आहे. मुंबईत पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झालेेेेेेेेेल्यांचा आकडा मोठा  आहे. तसेच राज्यात पोलिसांच्या मदतीला केंद्रीय पथके दाखल करण्यात आली आहेत. मात्र या पथकातील जवान देखील कोरोनाच्या कचाट्यातुन सुटले नाहीत. आतापर्यंत 22 जवानाना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 82 हजार 898 वर पोहचली आहे. यापैकी 37 हजार 390 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, 2 हजार 969 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या