एनसीबीने अटक केलेल्या मुच्छड पानवालाला किला कोर्टाकडून जामीन मंजूर

बॉलिवूड ड्रग्स प्रकरणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या  मुच्छड पानवालाच्या एका मालकाला  केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने(एनसीबी) अटक केली होती. न्यायालयाने त्याला १५ हजाराच्या जाचमुचलक्यावर सोडण्यात आले आहे.

 मुंबईतील सर्वात पॉश भागात, मुच्छड पानवाल्याचे एक पानाचे दुकान आहे. बॉलिवूड अभिनेत्रीची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला प्रकरणात चौकशीसाठी मुच्छड पानवालाचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्याला सोमवारी समन्स पाठवण्यात आला होता. सोमवारी दिवसभर त्याची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा दुसरा मालक रामकुमार  तिवारीला  अटक करण्यात आली. त्याच्याकडून अर्धा किलो गांजा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी आरोपी न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती. तिवारीला आज न्यायालयाने १५ हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

 दरम्यान, एनसीबीने शनिवारी एका ब्रिटिश नागरिकासह तीन लोकांना अटक केली होती. या तिघांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या तिघांमध्ये ब्रिटिश नागरिक करण सजनानीसह  राहिला फर्निचरवाला आणि तिची बहिण शाईस्ता फर्निचरवाला याचा समावेश आहे. यापुर्वी एनसीबीने अनेक बाॅलिवूडच्या सेलिब्रेटींना चौकशीला बोलावले होते. यामध्ये दीपिका पदुकोण, सारा खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे. तर अर्जुन रामपाललाही एनसीबीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. त्याचबरोबर त्याच्या बहिणीला सुद्धा चौकशीला बोलावण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या