Coronavirus update: संचारबंदीतही राज्यातील नागरीक मोकाट, तब्बल 1 लाख गुन्ह्यांची नोंद

देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून, याला आळा घालण्यासाठी सरकारने देशांत लॉकडाऊन घोषीत केला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नका. असे वारंवार सांगून देखील नागरिक बिनदिक्कत घराबाहेर पडत आहे. अशांवर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली. माञ कारवाईचा आकडा ही लाखाच्या वर पोहचला आहे. माञ तरी ही नागरिकांमध्ये कोरोना या महामारीबाबत गांभीर्य दिसत नाही.

मुंबईत लॉकडाऊन (Lockdown) कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही कार्यालये, दुकाने आदी चालविण्यास मनाई होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा किराणा दुकान तसेच अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे.  यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या लॉकडाऊनमध्ये समूहाने एकत्र येण्यासही मज्जाव आहे. नागरिकांनी एकत्रित बाहेर पडून संसर्गाची भीती वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली.  तर हे नियम मोडणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता 188 अंतर्गत कारवाई केली जाते. हे माहित असून काही बेशिस्त नागरिक थातूर माथूर कारणांसाठी घराबाहेर पडताना दिसतात. अशा 1 लाख 245 नागरिकांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे नोंदवले आहेत. यातील 19 हजार 297 नागरिकांना अटक केली असून 54 हजार 611 नागरिकांची वाहने पोलिसांनी जप्त केल्याची माहिती गृहमंञी (Home minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली आहे. अवघ्या 10 दिवसात पोलिसांनी अशांवर 13 हजार गुन्हे नोंदवले आहेत.

त्यातच मुंबईत करोनाचे सर्वाधिक बळी गेलेले आहे. आतापर्यंत 4 पोलिसांचे या महामारीने बळी घेतले असून 557 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांवर होणाऱ्या हल्याचे प्रमाण ही काही कमी नाही. पोलिसांवर हल्ल्याच्या 196 घटना घडल्या असून त्यात 689 जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.

 
पुढील बातमी
इतर बातम्या