एजंट स्मिथची आहे तुमच्या खात्यातील पैशांवर नजर

‘एजंट स्मिथ’ या व्हायरसच्या मदतीने सायबर चोरट्यांनी सध्या देशातील दीड कोटी नागरिकांच्या खात्यातून आतापर्यंत पैसे चोरले आहेत. राष्ट्रीय बँकांनी या व्हायरसची धास्ती घेतली असून हा व्हायरस अँड्राइड मोबाइलद्वारे पसरवण्यात येतो. हा व्हायरस इतका भयानक आहे की, त्यापासून गुगलही वाचू शकलं नाही. गुगलच्या प्ले स्टोरमधील १५ अॅपला आतापर्यंत या अॅपने लक्ष्य केलं होतं. मात्र गुगलने वेळीच हे अॅप बंद केल्याने मोठा अनर्थ टळला.

या व्हायरसने आतापर्यंत आशिया खंडातील पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका या प्रमुख देशांना मोठ्या प्रमाणात टार्गेट केलं आहे. जगभरातील अडीच कोटी फोन वापरकर्ते या व्हायरसचे बळी पडले असून भारतात दीड कोटी नागरिकांना या व्हायरसने नुकसान पोहोचवलं आहे. म्हणूनच एजंट स्मिथ हा व्हायरस नेमका काय आहे? तो कशा पद्धतीने आपल्या मोबाइलमध्ये घुसतो, त्याच्यापासून कसा बचाव करायचा? हे पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा...

  

हेही वाचा-

पुढील बातमी
इतर बातम्या