सिलेंडर ब्लास्टमुळे लागली आग

  • शिवशंकर तिवारी & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

दहिसर - दहिसर पश्चिम लिंक रोड गणपत पाटीलनगर गल्ली नंबर 5 च्या एका घरात मंगळवारी दोन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागली. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती. आग लागताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि अथक प्रयत्नानंतर आग विझवण्यात यश आलं. हंसराज मीणा यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत परिसरातील झोपड्या खाली केल्या. आगीत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही असंही सांगण्यात आलंय.

पुढील बातमी
इतर बातम्या