डॅडीला पॅरोल मंजूर

  • सतीश केंगार & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

भायखळा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची पत्नी आशा गवळी या आजारी असून 25 ऑक्टोबरला मुंबईतल्या रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रीया केली जाणार आहे. त्यामूळे गवळीने तुरुंग प्रशासनाकडे पॅरोलची विनंती केली होती. मात्र तुरुंग प्रशासनाने पॅरोल नाकारल्यानं गवळीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात गवळीला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. 21 ऑक्टोबरला गवळी तुरूंगातून बाहेर येणार असून 2 नोव्हेंबरला पुन्हा तुरुंगात परतण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने 2012 मध्ये गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. सध्या तो नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या