देशी कट्ट्यांसह काडतुसे जप्त

काशिमिरा पोलिसांनी दोन देशी कट्टयांसह, अवैध काडतुसे जप्त करून एका इसमाला बेड्या ठोकल्या आहेत. मेहताब मंजूर अंसारी असे या इसमाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या घरातून 2 देशी कट्टे,14 जिवंत काडतुसे, 2 सॅमसंग,1 लावा,1 विवो असे मिळून एकूण पाच मोबाईल जप्त केले आहेत ज्याची किमंत सुमारे 51,550 रुपये इतकी सांगितली जाते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याच्यावर याआधीही ठाणे आणि दहिसरमध्ये गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.

संदिप आवटी या गुप्तहेराने पोलिसांना मेहताब मंजूर अंसारी या व्यक्तीकडे देशी कट्ट्यासह काडतुसे असल्याची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या घरी धडक दिली असता पोलिसांना हा साठा सापडला.

पुढील बातमी
इतर बातम्या