'अशा' गेमपासून सावध रहा!, नाहीतर असं तुमच्यासोबतही घडू शकतं

एकीकडे ब्ल्यू-व्हेल सारख्या गेमचा धसका सगळ्यांनीच घेतला असताना आणखीही असे काही गेम आहेत ज्यामुळे तुम्ही गोत्यात येऊ शकता. या नवीन गेम तुम्हाला आत्महत्या जरी करायला लावणारे नसले तरी, असे गेम खेळून तुम्ही चांगलेच अडचणीत येऊ शकता. अशाच स्वरुपाचा गेम खेळणे हे अंधेरीतील एका तरुणीला महागात पडले असून शेवटी पोलिसांत तक्रार करायची पाळी मुलीच्या घरच्यांवर आली होती.

काय आहे या गेममध्ये?

१५ वर्षीय मुलगी ही आपल्या मोबाईलवर डेअर आणि ब्रेव्ह सारखा गेम खेळत होती. अशा प्रकारच्या गेममध्ये एकमेकांना वेगवेगळी आव्हाने दिली जातात. दोन प्लेयर्स किंवा अनेक प्लेयर्समध्ये हे गेम खेळले जात असून गेममध्ये प्लेयर्सना वेगवगळे टास्क दिले जातात आणि त्यानंतर हरणाऱ्यांना जे काही इतर बोलतील ते करावं लागतं. बहुतांश वेळा हरलेल्या व्यक्तीचे अश्लील फोटो मागितले जातात.

मुलीची फसवणूक

असाच काहीसे या १५ वर्षिय तरुणीसोबत घडले. एका टास्कमध्ये हरल्यावर तिच्याकडून तीचे अश्लील फोटो मागण्यात आले आणि जेव्हा हे फोटो समोरच्या व्यक्तीकडे पोचले तेव्हा त्याच खरं रूप समोर आलं. त्याने गैरफायदा घेत मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. सुदैवाने वेळीच हा सगळा प्रकार मुलीच्या वडिलांना समजला आणि त्यांनी याची तक्रार थेट एमआयडीसी पोलिसांत केली.

आरोपीला अटक

या प्रकरणी 23 वर्षीय तरुणाला गुजरातवरून आयटी अॅक्टसह पॉक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती. या प्रकरणी आम्ही तपास करत असल्याची माहिती" झोन १० चे डीसीपी नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

अमेरिकेत या गेमची सुरुवात झाली असून त्यानंतर याच वर्षी असे गेम आपल्या देशात लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारचे गेम्स हे जवळच्या मित्रांमध्ये खेळले जातात जिथे फक्त आमंत्रितांनाच प्रवेश असतो.

पुढील बातमी
इतर बातम्या