पत्नीसाठी टीव्ही खरेदी करणं पडलं महाग

मुंबई - उपनगरात डेबिट कार्डची हेराफेरी करणाऱ्या टोळीचा सुळसुळाट वाढला आहे. यामुळे एटीएममधून पैसे काढताना, भरताना आणि शॉपिंग करताना नागरिकांमध्ये घबराट उडाली आहे. कांदिवली आणि चारकोपनंतर डेबिट कार्डची हेराफेरी करणाऱ्या टोळीने मालाड (प.) ऑर्लेम चर्चच्या जवळ राहणारे हरी कुशवाहा (24) यांची देखील फसवणूक केलीय.


हरी कुशवाहा यांनी सांगितलं की पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी 3 मार्च 2017 ला ऑर्लेम चर्चजवळील एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात टीव्ही खरेदी करण्यासाठी गेले होते. मात्र त्यांच्याजवळ रोकड पैसे नसल्याने त्यांनी एसबीआयच्या डेबिड कार्डने पैसे भरले. त्याचवेळी हरी यांच्या मोबाइलवर मित्राचा फोन आला. त्यावेळी ते दुकानातल्या टेबलावरच आपला डेबिट कार्ड विसरून बाहेर गेले. मात्र जेव्हा ते पुन्हा दुकानात आले तेव्हा त्या टेबलावर एसबीआयचे बनावट डेबिट कार्ड ठेवले होते. ज्याला घेऊन ते घरी परतले. मात्र ते जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना त्यांच्या खात्यातून 52 हजार काढल्याचा मेसेज मोबाइलवर आला. त्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यावेळी त्यांनी बँकेत धाव घेत विचारणा केली असता त्यांचा डेबिट कार्ड कुणीतरी बदलले आणि त्यातूनच पैसे काढल्याचे बँक कर्मचाऱ्याने सांगितले.


सध्या हरी यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हरी यांच्या डेबिड कार्डमधून शेवटी काढलेल्या एटीएमच्या जागेवर लावलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मात्र आरोपी अद्यापही फरार आहे. यासंदर्भात मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर महाडिक यांनी सांगितले की फिर्यादीने पत्र लिहले आहे. त्याच आधारावर पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या