लाॅकडाऊनमध्ये 'ही' दोन खाती भ्रष्ट्राचारात पुढे

भारतात लाच घेतल्याशिवाय कुठले ही काम होत नाही, हे उघड सत्य आहे. माञ
लाॅ कडाऊनमध्ये महाराष्ट्रातील भ्रष्टाचार 83% घटला असला, तरी उर्वरित 17 टक्के लाचखोरीत विविध गुन्ह्यात इतरांना पकडणारे पोलिसच दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती एसीबीच्या आकडेवारी पुढे आली आहे. तर पहिल्या क्रमांकावर महसूल खात्याचा नंबर आहे. लाँकडाऊनच्या काळात म्हणजेच 24 मार्च ते 24 मे या कालावधीत एसीबीने 42 जणांना अटक केली. त्यात 13 पोलिसांचा समावेश असल्याचे म्हटलं आहे.

लाच घेऊ नका, देऊ नका हा संदेश विविध मार्गाने देत जनजागृती करूनही सरकारी खात्यामध्ये लाचखोरीचे प्रमाण काही कमी होत नाही. लाॅ कडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांमधील भ्रष्टाचार कमी झाला, माञ पोलिसांमधील भ्रष्टाचार काही कमी झालेला नसल्याचे एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 18 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात मुरूम भरून नेहणाऱ्या एका ट्रँक्टर चालकाला दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी अडवून त्यावेळी पोलिसांसोबत असलेल्या एका खासगी व्यक्तीने कारवाई न करण्यासाठी 50 हजारांची लाच मागितली. त्यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी लाच स्विकारताना आरोपींना रंगेहाथ अटक केली होती. तर 14 मे रोजी नागपूरात एका पोलिसाने दारूच्या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी देत, कारवाई न करण्यासाठी 13 हजाराचू लाच स्विकारताना अटक केली. यासारखी अनेक घटना राज्यातील विविध जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत.

एकूणच महाराष्ट्रात एप्रिल 2019 च्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये 88% गुन्हे घटले आहे. माञ लाँकडाऊनमुळे सरकारी कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने हे गुन्ह्यांचे प्रमाण घटल्याचे म्हटंल्यास चुकीचे ठरणार नाही. एप्रिल 2019 मध्ये 58 गुन्ह्यात 77 जणांना अटक केली होती. त्या तुलनेत एप्रिल 2020 मध्ये फक्त 7 गुन्हे नोंदवण्यात आले असून 9 जणांना अटक करण्यात आली आहे. तर जानेवारी आणि फेब्रुवारी 2020 च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, या दोन महिन्यात विविध त्या सरकारी खात्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अँटी करप्शन ब्युरो किंवा एसीबी) ने 32 सापळे लावले असून 46 जणांना अटक केली आहे. गेल्या वर्षी, 2019 मध्ये याच कालावधीत 118  सापळ्यांमध्ये 167 जणांना अटक करण्यात आली होती. आकडेवारी पाहिली तर   88 % गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले असले. तरी महसूल विभागाला मागे टाकून पोलिस विभागात भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढलेले असल्याचे निदर्शनास आले आहे. या दोन महिन्यात पोलिस दलात 17 गुन्ह्यांमध्ये 28 जणांना  लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. तर तर महसूल विभागात 11 गुन्ह्यांमध्ये 15 जणांना पकडण्यात आले आहे. तर वनविभागात 7 गुन्ह्यांची नोंद असून 11 जणांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे. तर प्रामाणिक पणाचे धडे शिकवणारे शिक्षक ही यात मागे राहिलेले नाही. शिक्षण विभागात 5 गुन्ह्यांची नोंद असून 7 जणांना पकडण्यात आले आहे. 

लाचखोरांविरुद्ध सापळे यशस्वी होण्यात राज्यातील इतर शहरांपेक्षा मुंबईचा क्रमांक सर्वात शेवटचा आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत लाचखोरी कमी झालेली नसली तरी लाचखोर सापडण्याच्या संख्येत मात्र कमालीची घट झाल्याचे राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केलेल्या आकडेवरून आढळून आले आहे. पुण्यामध्ये सर्वाधिक लाचखोर पकडले गेले तर सर्वात कमी लाचखोर मुंबईत आढळले आहेत. सर्वाधिक लाचखोरांना पकडण्यामध्ये पुणे  (54) आघाडीवर असून त्यापाठोपाठ अमरावती  (13), ठाणे (22), नाशिक (33),. नांदेड (24), औरंगबाद (29), नागपूर (27) आणि मुंबई (10)यांचा क्रमांक लागतो. 

आकडेवारी जानेवारी-फेब्रुवारी 2020 

परिक्षेत्र           गुन्हे                   आरोपी

मुंबई               7          11

ठाणे             11           18

 

पुणे            23            36

 

नाशिक        9            13

 

नागपूर        5            5

 

अमरावती         13           19

 

औरंगाबाद         7           9

 

नांदेड               9            9

पहिली पाच लाचखोर खाती 

 

खाते                     सापळे         आरोपी

पोलिस                    17           28

महसूल, भूमी अभिलेख         11           15

वनविभाग                7         11

महानगर पालिका             6         8       

म.रा.वि.वि.कं. मर्यादीत        6         8

पुढील बातमी
इतर बातम्या