समृद्ध जीवनची १०१ कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) महेश किसन मोतेवार यांच्या मालकीच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडचे मुख्य प्रवर्तक व व्यवस्थापकीय संचालकांनी चालवलेल्या फसव्या योजनांमधून जमवलेली १०१.३० कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली अाहे. महाराष्ट्रासह तब्बल सात राज्यांमधून समृद्ध जीवनची मालमत्ता जप्त करण्यात अाली अाहे. या मालमत्तेमध्ये जमिनी, घरे, दुकाने अाणि कार्यालयांचा समावेश अाहे.

मोतेवार कुटुंबियांच्या नावाने बहुतांश मालमत्ता

यापैकी बहुतांश मालमत्ता ही महेश मोतेवार अाणि त्याच्या दोन पत्नी तसंच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या नावाने खरेदी करण्यात अाल्या होत्या. लोकांची फसवणूक करणाऱ्या या योजनांमधून जमवलेली हा पैसा अापल्या अन्य उद्योगधंद्यांसाठी तसंच अन्य कंपन्यांच्या वृद्धीसाठी तसंच स्वतःच्या एेशोरामासाठी अाणि वैयक्तिक फायद्यासाठी वापरला जात होता, असं सक्तवसुली संचालनालयाच्या तपासात निष्पन्न झालं अाहे.

काय अाहे प्रकरण?

महेश किसन मोतेवार यांच्या मालकीच्या समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडने बकरी अाणि म्हशी पालनाच्या उद्योगात गुंतवणूक करण्यासाठी लोकांकडून पैसे गोळा केले होते. समृद्ध जीवनचा मुख्य प्रवर्तक अाणि व्यवस्थापकीय संचालक हा कमिशन एजंटच्या माध्यमातून भोळ्या गुंतवणूकदारांकडून मोठ्या रकमेचे डिपाॅझिट जमा करीत असे. या कमिशन एजंट्सना घसघशीत कमिशन दिले जायचे. बकरी, म्हशी पालनातून तुम्हाला मोठा फायदा होईल, अशा भूलथापा गुंतवणूकदारांना दिल्या जात असत.

पुढील बातमी
इतर बातम्या