पीएनबी घोटाळा प्रकरण : ईडीचे पाच ठिकाणी छापे

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने मेहूल चौक्सीच्या 5 कंपन्यावर सोमवारी छापेमारी केली. ईडीने अंधेरी, वडाळा, नेपियन्सी रोड या ठिकाणीही कारवाई केल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे.

कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा

मेसर्स डायमंड आरयूएस, मेसर्स सोलार एक्सपोर्ट, मेसर्स स्टेलर डायमंड्स या कंपन्यांनी परदेशातील देणी चुकवण्यासाठी जानेवारीत पीएनबी बँकेला बायर्स क्रेडिटसाठी विनंती केली होती. दरम्यान या गैर व्यवहारात बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जाणून बुजून केलेला निष्काळजीपणाही उघडकीस आला आहे.

'हे' या कंपन्यांचे भागीदार

आयातदारांच्या बँकांनी दिलेल्या लेटर ऑफ कम्फर्टच्या आधारावर अर्थपुरवठा केला जातो. पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी नियमबाह्यपणे आठ हमीपत्र (लेटर ऑफ अंडरटेकिंग) इश्यू केली. अलहाबाद बँकेच्या हाँगकाँगमधील शाखेसाठी पाच हमीपत्र आणि अॅक्सिस बँकेच्या हाँगकाँग शाखेसाठी तीन हमीपत्रे जारी करण्यात आली असून नीरव मोदी, अॅमी मोदी आणि मेहुल चौक्सी हे या कंपन्यांचे भागीदार आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या