कांदिवलीतून आठ बांगलादेशींना अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

मुंबईच्या कांदिवली परिसरातून महाराष्ट्र एटीएसच्या नागपाडा यूनिटच्या पोलिसांनी ८ बांगलादेशींना अटक केली आहे. हे अाठही जण याठिकाणी बेकायदेशीररित्या वास्तव्याला होते. हे सर्वजण १८ ते २२ या वयोगटातील आहेत.

बांगलादेशींचे वाढते प्रमाण

शहरात बांगलादेशी नागरिकांचे वाढते प्रमाण आणि पुण्यात बांगलादेशी दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याला अटक केल्यानंतर एटीएसने छुप्या पद्धतीने वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या मुसक्या आवळण्यास सुरूवात केली आहे. ही सर्व मुले भारतात घुसखोरी करून आल्याची कबुली त्यांनी पोलिसांना दिली आहे. त्यानुसार त्यांच्याविरोधात १९४६ च्या फॉरेनर्स अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयानं ३१ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

काय काम करत होती?

ही सर्व मुले मुंबईत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या असेंब्लिंगचं काम करत होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली अाहे. या अटक करण्यात अालेल्या सर्व आरोपींकडे बनावट भारतीय पॅनकार्ड व आधारकार्ड सापडले आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

वेश्या व्यवसायातून बांगलादेशी तरुणीने केली स्वत:ची सुटका

बांगलादेशींना भारतीय नागरीकत्व देणारा गजाआड

पुढील बातमी
इतर बातम्या