मुंबई पोलिसांना नववर्षाची अनोखी भेट

मुंबई - मुंबई पोलिसांना नेहमी 16 ते 18 तास काम करावं लागते. त्यातच बंदोबस्त असला किंवा एखादा सण असला पोलिसांना सुट्ट्या देखील मिळत नाही. पण नव्या वर्षाच्या निमित्ताने मुंबई पोलिसांना एक एनोखी भेट देण्यात आली आहे. आता मुंबई पोलिसांची ड्युटी आठ तास करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिली आहे. यासह मुंबई पोलीस दलात आणखी काही महत्त्वाचे बदल होणार असल्याचंही समजतं.

देवनार पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायानं आयुक्तांना 73 पानी पत्रंही लिहिलं होतं त्या पत्राची दखल घेत मुंबई पोलीस आयुक्तांनी 1 जानेवारीपासून मुंबई पोलिसांच्या ड्युटीत बदल केले. मुंबई पोलिसांच्या अखत्यारितील काही कक्षही कायमस्वरुपी बंद करण्यात येणार आहेत. यात प्रामुख्यानं गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी कक्ष, मालमत्ता कक्ष, वाहनचोरी विरोधी कक्ष, सोनसाखळी चोरी विरोधी कक्ष, सीआययू विभागाचं लॉजिस्टिक युनीट, तसंच दोन सशस्त्र बल गट यांचा समावेश आहे. या निर्णयाचं स्वागत असून. यामुळे पोलिसांना आता मानसिक ताण होणार नसल्याचं नाव न घेण्याच्या अटीवरून काही पोलीस शिपायांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या