दादर हे मुंबईतील गर्दीचे रेल्वे स्थानक मानले जाते. त्यामुळे सेंट्रल वेस्टर्नच्या सर्वच प्रवाशांची या ठिकाणी नेहमीच गर्दी असते. अशातच एखादा अपघात झाल्यानंतर तात्काळ सेवा उपलब्ध नसते. अशा वेळी अपघाती प्रवाशाला प्राण गमवावे लागतात.
असाच प्रसंग दादर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक 1 वर पाहायला मिळाला. दुपारी 2 च्या दरम्यान दादर स्थानकावरून कल्याणच्या दिशेने जात असलेल्या लोकलमधून इंद्रकुमार फडणीस वय वर्ष 67 हे खाली पडले. फडणीस हे खाली पडण्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रेन मध्ये त्याच वेळी एका इसमाने त्यांचा मोबाईल चोरी करून त्यांना ट्रेन मधून खाली ढकलून दिले.
परंतु मुळात 108 ही तात्काळ सेवा रेल्वेसाठी असून देखील या ठिकाणी डॉक्टर, ड्राईव्हर उपस्थित नसणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. दरम्यान, रेल्वेमध्ये वारंवार होण्याऱ्या या चोऱ्यांवर आळा बसणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया आकीब शेख यांनी दिली.