लाच घेतल्या प्रकरणी ज्यु. इंजिनिअरला अटक

  • मुंबई लाइव्ह टीम & सूरज सावंत
  • क्राइम

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेच्या ज्युनिअर इंजिनिअरला 50 हजारांची लाच घेताना गुरूवारी अटक केली. प्रमोद दिनकर भोसले असं त्याचं नाव आहे. पाणी खात्यात नव्याने घेण्यात आलेल्या मशिन व्यवहारात 3 टक्के कमिशनसाठी तो लाच मागत होता.

पोलिसांचा तपास सुरू

भायखळा पालिका विभागात प्रमोद हा ज्यु. इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. पालिका कार्यालयात स्वच्छ पाणी कर्मचाऱ्यांना मिळावं यासाठी वॉटर प्युरिफायर मशिन बसवण्यात येणार होत्या. या मशिन 1 कोटी 80 लाख 30 हजार रुपयांना खरेेदी केल्या होत्या. या मशीन बसवण्यासाठी ज्यु. इंजिनिअर प्रमोद हे 3 टक्के कमिशन मागत होता. मात्र तक्रारदारांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी याप्रकरणाची तक्रार लाच लुचपद विभागाकडे केली. त्यानुसार लाचेचा पहिला हप्ता 50 हजार घेताना प्रमोद यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी प्रमोद यांच्यावर गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या