'इरॉस'चं सील कायम, कार्यालये उघडली

चर्चगेट - खंबाटा एव्हिएशन कंपनीत काम करणाऱ्या 2000 हजार कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या अनेक वर्षांपासून झालेला नाही. त्यामुळे बुधवारी शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी खंबाटा कंपनीच्या मालकीची इरॉस इमारत आणि सर्व आस्थापनांना सील ठोकले होते. मात्र गुरुवारी सकाळी झालेल्या सुनावणीच्यावेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार इरॉस इमारतीमधील पहिला, चौथा आणि पाचव्या मजल्यावरील कार्यालये,  तळमजल्यावरील प्रोन्टो शॉप याचे सील काढण्यात आले. पण इरॉस थिएटरचे सील काढलेले नाही.

या कंपनीकडून 4 कोटी 45 लाख 14 हजार 633 रुपयांचं कामगारांचं देणं आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खंबाटा कंपनीच्या विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तसंच खंबाटा कंपनी आणि बीडब्ल्यूएफएसच्या विरोधातही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

पुढील बातमी
इतर बातम्या