तुम्ही बनावट सनस्क्रिन क्रीम वापरताय का?

  • मिलिंद सागरे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

घाटकोपर - सुमारे 1 हजार किलोचं बनावट सनस्क्रिन लोशन अन्न आणि औषध प्रशासन विभागानं जप्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या 'बनाना बोट' या सनस्क्रिनची हुबेहुबे नक्कल बाजारात विक्रीसाठी आणली गेल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली आणि त्यांनी ही कारवाई करत हा माल जप्त केला आहे.

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच या कारवाईत सौंदर्यप्रसाधनांसाठी लागणाऱ्या ट्यूब्ज आणि त्या भरण्यासाठी लागणारी यंत्रे आढळली आहे. उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात सनस्क्रिनचा वापर केला जातो.

विशेषत: महिला याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात आणि याचाच फायदा घेत आंतरराष्ट्रीय ब्रँड असलेल्या 'बनाना बोट' या सनस्क्रिनची हुबेहुबे क्रीम बाजारात विक्रीसाठी आणली होती. 

दरम्यान, अशा प्रकारची बोगस आणि बनावट सौंदर्य प्रसाधनं वापल्यास शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांना सतर्क राहण्याचं आवाहन कॉस्मेटिक सर्जन गौरी चव्हाण यांनी केलंय. त्यामुळे जर तुम्ही बाजारात सनस्क्रिन क्रीम घ्यायला गेलात, तर सावधान.. कारण कदाचित ती बनावट क्रीम असू शकेल.

पुढील बातमी
इतर बातम्या