अन्न आणि औषध प्रशासनाकडून भेसळयुक्त खवा जप्त

  • भूषण शिंदे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुलुंड - ऐन दिवाळीमध्ये जेव्हा मिठाई आणि खव्याच्या पदार्थांना जास्त मागणी असते तेव्हाच अवैधरित्या खवा मुंबईमध्ये आणताना पकडण्यात आलाय. अॅड. देवेंद्र पाटील यांनी ऐरोली मुलुंड चेकनाक्याहून एका संशयित टेम्पोला जकात नाका चुकवून जाताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) ला कळवलं. एफडीएनं दीड हजार किलो खवा जप्त करत तपासणीसाठी पाठवला आहे. संबंधित अधिकारी आणि भेसळयुक्त खवा बनवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या