मास्क न वापरणाऱ्या ५३४ जणांवर गुन्हे दाखल

शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणावर मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांवर मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. मास्क न लावणाऱ्या 534  बेशिस्त नागरिकांवर पोलिसांनी आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहे. या सर्वांवर पोलिसांनी भा.द.वि कलम 188 नुसार गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झालेली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लाँकडाऊन पुकारण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी गरजे व्यतिरिक्त बाहेर पडू नये, पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी एकञ जमू नये, तसेच तोंडाला मास्क वापरणे सक्तीचे केले असताना. काही बेशिस्त नागरिक आज ही या नियमांची पायमल्ली करताना दिसत आहेत. अशा बेशिस्त नागरिकांमुळेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यात अडचणी येत असल्याचे अनेक उदाहरणातून दिसून आले आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांवर पोलिसांनी काही दिवसांपासून कारवाई करण्यास सुरूवात केली.

पोलिसांनी या पूर्वीच नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर
आतापर्यंत 10 हजार 243 गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 6 हजार 414 जणांना अटक करून त्याची जामीनावर मुक्तता केली आहे. तर 2131 जणांचा पोलिस शोध घेत आहेत. 2598 जणांना पोलिसांनी आतापर्यंत नोटीस दिल्या आहे. माञ या सर्वांमध्ये सर्वात बेजबाबदार म्हणून मास्क न लावणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे.

पोलिसांनी मास्क न लावणाऱ्यांविरोधात 18 एप्रिल पासून कारवाई सुरू केली. अवघ्या दहा दिवसात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 534 जणांवर गुन्हा नोंदवला आहेत.  पश्चिम आणि मध्य मुंबईत मास्क न लावणाऱ्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. सोमवारी दिवसभरात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्या 45 जणांवर कारवाई केली आहे. सरकारकडून वेळोवेळी सांगून समाजसेवी संस्थांनी मास्कचे वाटप करून सुद्धा ही महामारी पसरवण्यास मदत करणाऱ्या अशा बेजबाबदारांना पोलिस चांगलाच खाकीचा धाक दाखवताना दिसत आहेत.

या पूर्वीच Covid -19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी, केंद्र सरकारनं आज मास्क वापरणं अनिवार्य करणं तसंच थुंकण्यावर पूर्ण बंदी घालणारे निर्देश जारी केले आहेत. सार्वजनिक तसंच कामाच्या ठिकाणीही मास्कचा वापर अनिवार्य आहे. 5 पेक्षा जास्त जणांनी एकत्र येण्यावर सरकारनं यापूर्वीच बंदी घातली आहे.
पुढील बातमी
इतर बातम्या