रती अग्निहोत्रीवर वीजचोरीचा गुन्हा

  • पूजा वनारसे & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

मुंबई - बॉलीवूड अभिनेत्री रती अग्निहोत्री आणि तिच्या पतीविरुद्ध गुरुवारी वरळी येथील घरात मीटरमध्ये फेराफेर करून 49 लाखांच्या वीजचोरीचा गुन्हा दाखल झाल्याने सिनेजगतात खळबळ उडाली आहे. रती वरळी येथील स्टर्लिंग सोसायटीत कुटुंबीयांसोबत राहतात.

 

गुरुवारी बेस्टच्या दक्षता समितीला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीत त्या चोरीची वीज वापरत असल्याचं समजलं. बेस्टच्या दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी छापा टाकला. आतापर्यंत जवळपास 49 लाखांची वीज त्यांनी वापरल्याचा संशय असल्याची माहिती बेस्टचे जनसंपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी दिली. त्यानुसार, दक्षता समितीच्या अधिकाऱ्यांनी वरळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून रती आणि त्यांच्या पतीविरुद्ध वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या तीन ते साडेतीन वर्षापासून हा प्रकार सुरू असतानाच बेस्टच्या दक्षता पथकानं कारवाई करत वीजचोरी उघडकीस आणली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या