मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात चावडा कमर्शियल इमारतीमधील एका गाळ्यात मंगळवारी भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, मालाडमधील एव्हरशाईन मॉलच्या मागे असलेल्या विजय इंडस्ट्रीयल इस्टेट येथील चावडा कमर्शियल इमारतीमधील एका गाळ्याला ही आग लागली असून, आग विझविण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाच्या आठ गाड्या दाखल झाल्या आहेत.