मुंबई विमानतळावर 43 लाखाचं परदेशी चलन जप्त

मुंबई - आंतरराष्ट्रीय विमानतळावर 43 लाख 15 हजार 600 रुपयांचे परदेशी चलन घेऊन दुबईला निघालेल्या एकाला हवाई गुप्तचर विभागाने अटक केली आहे. मोहम्मद शोहीब अरब असे या व्यक्तीचे नांव असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडीगो एअरलाइन्सच्या 6E63 या विमानाने मोहम्मद दुबईला निघाला होता. बोर्डिंग पासच्या रांगेत चाललेली संशयास्पद हालचाल हवाई गुप्तचर विभागाच्या निदर्शनास आली. या वेळी त्यांनी मोहम्मदला थांबवत त्याची बॅग तपासली असता त्यात विविध देशांचे परकीय चलन असल्याचे आढळून आले. यामध्ये 15 लाख 9 हजार युएई दिराम्स, 6 हजार सौदी रियाल्स आणि 20 हजार अमेरिकी डॉलर असे मिळून 43 लाख 15 हजार 600 रुपये किंमतीचे परदेशी चलन असल्याचे आढळले.

अधिक चौकशी केली असता मोहम्मदने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ मोहम्मदला अटक केली.

पुढील बातमी
इतर बातम्या