दीड कोटी रूपयांच्या परदेशी चलन चोरीचा गुन्हा विलेपार्ले पोलिसांनी सोड़वला असून या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आपलं पाप धुण्यासाठी आरोपी चारधाम यात्रेला गेल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी एका स्कॉर्पियो गाडीसह जवळपास एक कोटी रुपये किमतीचं परदेशी चलन पोलिसांनी जप्त केलं आहे.
विलेपार्ले येथील मांगलिक फोरेक्स आणि एमआईडीसी येथील व्हिकेसी फॉरेक्स या कंपनीमधून 18 मार्चला तब्बल दीड कोटींचे परदेशी चलन चोरीला गेल्याचं समोर आलं होतं. ज्यात पाऊंड, डॉलर, यूरोसह इंडोनेशियन चलनाच समावेश होता. ज्यावेळी कंपनीतील सीसीटीव्हीचे फूटेज तपासण्यात आले तेव्हा या चोरीमध्ये कंपनीत काम करणाऱ्या भगवतसिंग वाघेला आणि जसवंत सिंग यांचा हात असल्याचं समोर आलं.