गुंतवणूकदारांना गंडवणारा गजाआड

दामदुपटीचं आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची ९൦൦ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या अथर्व फोर यू व ऍग्रो लि. व्यवस्थापकीय संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. शिवाजी निकाडे (५७) असं या आरोपीचं नाव असून तो दहिसर येथील रहिवासी आहे.

गुन्हे शाखेकडे केली तक्रार

२൦११ मध्ये कंपनी स्थापन केल्यानंतर बांधकाम, टुरिझम, रिसॉर्ट, हॉटेल आदी विविध व्यवसायांमध्ये कंपनी काम करत असून तिच्यात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून पैसे घेण्यात आले होते. तीन, पाच आणि सात वर्षांसाठी गुंतवणूक करून अनुक्रमे दुप्पट, तिप्पट आणि चौप्पट रक्कम करण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. 

परतावा न मिळाल्यामुळे अखेर जून महिन्यामध्ये दहिसर येथील रहिवासी असलेल्या तक्रारदारांनी याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत याप्रकरणी पाचशे तक्रारदार आर्थिक गुन्हे शाखेकडे आले आहेत.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आतापर्यंतच्या तपासात ९൦൦ कोटी रुपयांची ही गुंतवणूक असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितलं. याप्रकरणी आरोपीविरोधात फसवणुकीसह महाराष्ट्र गुंतवणूदार हक्क संरक्षण कायदा(एमपीआयडी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला १൦ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या