१८ केनियन महिला सोने तस्करी प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात

१८ केनियन महिलांना सोने तस्करी प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केनियन महिलांना कस्टम अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या संबंधित महिलांकडून कस्टम अधिकाऱ्यांनी तब्बल २ कोटी रुपये किंमतीचं ४ किलो सोनं हस्तगत केलं आहे. हे सोनं या महिला खान्या पिण्याच्या साहित्यातून नेत होत्या. तर काही सोनं अंतवस्रात आणि डोक्यातील विकमध्येही लपवण्यात आलं होतं.

तपासात हे सर्व समोर आल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, या प्रकरणी अंदाजे १८ केनियन महिलांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास संबंधित अधिकारी करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या