घरफोडी करणाऱ्या आरोपीला ७ वर्षानंतर अटक

सात वर्षापूर्वी एका व्यापाऱ्याच्या घरात चोरी करून पळालेल्या आरोपी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. दीन मोहम्मद उर्फ संजय शर्मा असे या आरोपीचे नाव आहे. चोरीकरून पळालेल्या दीन हा नाव बदलून वास्तव्य करत असल्यामुळे पोलिसांना त्याचा माग काढण्यात अडचणी येत होत्या. अखेर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे त्याला अंधेरीतून अटक करण्यात आली आहे.

मुंबईच्या गोवंडी परिसरात राहणारा दीन हा एमआयडी परिसरात राहणाऱ्या एका व्यापाऱ्याकडे कामाला होता. २०१५ मध्ये त्याला व्यापाऱ्याच्या पत्नीने घरात कुणी नसताना. अंधेरी परिसरातील फ्लॅटमधून कुराण आणण्यासाठी पाठवले होते. दीन मोहम्मद तक्रारदाराच्या घरी कुराण आणण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी असलेली रोख रक्कम, सोने-चांदी असा ६८ लाख रुपयांचा ऐवज घेऊन पळून गेला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली होती. गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन हा गुन्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. गुन्हे शाखेला ही आरोपीची माहिती मिळत नसल्यामुळे त्यांनी तपास थांबवला.

मूळचा बिहारचा असलेला दीन मोहम्मद याने चोरी करून मथुरा येथे पलायन केले. त्या ठिकाणी तो स्वतःचे नाव बदलून बनावट कागदपत्रांच्या आधारावर संदीप शर्मा या नावाने रहात होता. मात्र, गेली सात वर्षे चोरी केलेले सोने-चांदीचे दागिने विकण्यासाठी अधून-मधून तो मुंबईतील जव्हेरी बाजारामध्ये येत होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील जव्हेरी बाजारातून दीन मोहम्मद उर्फ संजय शर्मा या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या