मुंबई : विमानतळावर दोन तस्करांकडून सात कोटींचे सोने जप्त

जयपूर (jaipur) आणि मुंबई (mumbai) दरम्यान उड्डाण केल्यानंतर मुंबई विमानतळावर (mumbai airport) उतरलेल्या दोन प्रवाशांकडून महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांनी 7.69 कोटी रुपयांच्या किमतीचे 9487 ग्रॅम सोने (gold) जप्त केले.

जयपूर-मुंबई विमानातून प्रवास करणारे दोन प्रवासी सोन्याची तस्करी (smuggling) करत असल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई विमानतळावर पाळत ठेवली.

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी जयपूर-मुंबई फ्लाइटमधून उतरलेल्या दोन प्रवाशांना (passangers) त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना रोखले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता 7.69 कोटी रुपयांचे 9487 ग्रॅम सोने सापडले.

दोन्ही प्रवासी बनावट ओळखपत्र घेऊन प्रवास करत असल्याचेही आढळून आले. दोन्ही प्रवाशांना सीमा शुल्क कायदा, 1962 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.


हेही वाचा

प्रवाशांची मागणी पूर्ण करण्यासाठी बेस्टचा संघर्ष

नोव्हेंबरमध्ये 'या' तारखेला संपूर्ण महाराष्ट्राला अतिरिक्त सुट्टी जाहीर!

पुढील बातमी
इतर बातम्या