लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडला लॅपटॉप

वडाळा - लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे 50 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप सापडला. लॅपटॉप परत मिळाल्याने पल्लवी भालेराव यांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले.

शुक्रवारी सायंकाळी पनवेल-वडाळा लोकल प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या पल्लवी भालेराव यांची लॅपटॉपची बॅग लोकल मधून उतरण्याच्या घाईगडबडीत डब्ब्यात राहिली. लोकल सुटल्यावर लॅपटॉप लोकलमध्येच राहिल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तात्काळ मुंबई रेल्वे पोलीस हेल्पलाईन येथून वडाळा रेल्वे स्टेशन येथील हेल्पलाईन फोनवर संपर्क साधला आणि पनवेल ते वडाळा लोकलच्या प्रथम वर्गाच्या महिलांच्या डब्यात एक ब्राऊन रंगाची लॅपटॉपची बॅग राहिलेली आहे, अशी तक्रार दाखल केली तक्रार दाखल होताच पोलीस शिपाई कोकणे यांनी तात्काळ सदरची लोकल पकडून महिला डब्याची तपासणी केली असता ती बॅग सापडली. तात्काळ वडाळा लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले. पल्लवी भालेराव यांच्याशी संपर्क करून त्याना लॅपटॉप बॅग ताब्यात घेतल्याची समज दिली. लॅपटॉप मिळाल्याचे समजताच भालेराव यांचा जीव भांड्यात पडला. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तक्रारदाराची खात्री करून शनिवारी भालेराव यांना त्यांची (50, 000.) रुपये किमतीची लॅपटॉपची बॅग पोलीस उपनिरीक्षक सदाशिव खोत यांचा हस्ते देण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या