हातगाड्या भाड्यानं देणाऱ्याला अटक

  • भारती बारस्कर & मुंबई लाइव्ह टीम
  • क्राइम

वडाळा - प्रत्येक हातगाडीमागे दिवसाला 100 रुपये घेऊन हातगाड्या भाड्यानं देण्याचा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या एका लक्षाधीश भामट्याला वडाळा टी टी पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली. रसूल हशमत खान (26) असं त्याचे नाव असून तो सीएसटी रोडवरील वत्सलाताई नाईकनगरचा रहिवासी आहे. कारखान्यात दुरुस्तीसाठी आलेल्या 25 हातगाड्या जप्त करून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जप्त केलेल्या सर्व हातगाड्या पालिकेच्या एफ -उत्तर विभागाकडे दिल्या आहेत.

वडाळ्यातील संगमनगर, शांतीनगर तसंच भारतीय कमलानगरमधील रस्त्यावर चारचाकी हातगाड्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याची माहिती वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुशील कांबळे यांना मिळाली. त्यांनी या हातगाड्यांच्या मालकावर कारवाई करण्याचे आदेश उपनिरीक्षक दीपक साळुंके यांना दिले. त्यांनी आपल्या पथकासह रसूलच्या कारखान्यावर छापा घालून 25 हातगाड्यां जप्त केल्या आणि त्याच्याही मुसक्या आवळल्या.

पुढील बातमी
इतर बातम्या