मुंबई विमानतळावर २४७ कोटींचे ३५ किलो हेरॉइन जप्त

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी हेरॉइन जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. जवळपास ३५ किलो हेरॉइन हवाई गुप्तचर कक्षानं (एआययू) केलेल्या कारवाईत जप्त करण्यात आलं. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत २४७ कोटी रुपये आहे.

पोलिसांनी याप्रकरणी २ परदेशी नागरिकांना एआययूने ताब्यात घेतले आहे. हेरॉइनचा साठा मुंबई विमानतळावर येणार असल्याची गुप्त माहिती केंद्रीय यंत्रणांना मिळाली होती. त्यानुसार एआययूच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर ४ संशयित बॅगा ताब्यात घेतल्या.

त्यांची तपासणी केली असता त्यात पावडर स्वरूपात पदार्थ सापडला. त्याची तपासणी केली असता ते हेरॉइन असल्याचे निष्पन्न झाले. ४ बॅगांमधून सुमारे ३५ किलो हेरॉइन सापडले असून त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २४७ कोटी रुपये एवढी आहे.

याप्रकरणी झिम्बाब्वेचे नागरिक असलेली ४६ वर्षांची महिला व २७ वर्षांच्या पुरुषाला ताब्यात घेतले आहे. चौकशीत दोघेही झिम्बाब्वेतील हरारे येथील रहिवासी आहेत. तेथे त्यांना हेरॉइन देण्यात आले होते. तेथून हेरॉइनच्या बॅगा घेऊन दोन्ही संशयित मुंबईत आले.

पण एआययूचे अधिकाऱ्यांनी तेथे सापळा रचला होता. ते दोघेही तेथे आल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन बॅगांची तपासणी करण्यात आली.

पुढील बातमी
इतर बातम्या